सातारा येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या 67 व्या वर्धापन दिनास कोल्हापूर जिल्ह्यातील ५०००कार्यकर्ते सहभागी होऊन महाशक्ती प्रदर्शन करणार

कोल्हापूर (संग्राम पाटील)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक व राजकीय अस्तित्व निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापनदिन सोहळा ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात होत असून कोल्हापूर जिल्ह्यातून ५००० हजारांहून अधिक कार्यकर्ते या सोहळ्याला जाणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) कोल्हापूर जिल्ह्याची ताकद काय आहे हे दाखवण्याचा निर्धार कसबा बावड्यातील शासकीय विश्रामगृह कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे होते. उत्तमदादा कांबळे म्हणाले, रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला लोकशाही निर्माण करणारा आहे.

हा पक्ष महायुतीसोबत जरी असला तरी देखील विचाराला तडजोड करणारा नाही. अशा या सामाजिक समतेवर व विचारांवर आधारित असलेल्या रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन सोहळा ऐतिहासिक सातारा शहरात मोठ्या दिमाखात व येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाची ताकद काय आहे हे दाखवण्यासाठी व आमची भविष्यातील राजकीय भूमिका ठरवण्यासाठी याच्यावर विचारमंथन होणार असून या मेळाव्याला राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरातून रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकरी चळवळीचे पाच हजार कार्यकर्ते महाशक्ती प्रदर्शन करून निळ्या वादळासहित सहभागी होतील असा निर्धार केला आहे. या बैठकीला राज्य सचिव मंगलराव माळगे, राज्य उपाध्यक्ष कुमार कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर, किशोर सडोलीकर ,गौतम कांबळे जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नंदाताई भास्कर, शहराध्यक्ष सुखदेव बुद्धळकर, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, दिलीप कांबळे, सरदार कांबळे, तानाजी कांबळे, अविनाश आंबपकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या बैठकीला जयश्री जावळे, बाळासाहेब सोरटे, अनिल हातकलंगलेकर, किशोर तिसंगीकर, संतोष कांबळे, गजेंद्र कांबळे, नामदेव कोथळीकर, अतुल सडोलीकर, सचिन कोनवडेकर यांसहित प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर यांनी केले.