कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण,काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार

कोल्हापूर: कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. 5 ऑक्टोबरला राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी कोल्हापुरात होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनात विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधतील. संमेलनात सहभागी असणाऱ्या सर्व संघटनासोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत संविधानासंदर्भात विस्तृत चर्चा केली जाणार आहे. प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.

 

दरम्यान गुरुवारी किंवा शुक्रवारी राहुल गांधी यांचे पथक कोल्हापुरात येऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी करणार आहेत तसेच ही पाहणी करून सुरक्षा तैनात केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने राहुल गांधी यांचे महाराष्ट्र दौरे वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

🤙 8080365706