85 वर्षीय वृध्देवर नराधमाकडून अत्याचार

पुणे : 85 वर्षीय वृद्ध महिलेवर एका नराधमाने फडफडत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जखमी झालेली वृद्ध महिला जिन्यात विव्हळत होती. त्या महिलेची शोधाशोध केली असता ती जखमी अवस्थेत जिन्यावर दिसून आली. हा धक्कादायक प्रकार म्हाळुंगे येथे उघडकीस आला. याप्रकरणी आरोपी ओम जयचंद पुरी (वय23,रा.धाराशिव) याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इलेक्ट्रिशनचे काम करतो. दरम्यान सोमवारी संध्याकाळी पीडित वृध्द महिला सोसायटीतील पाचवा मजल्यावर आपल्या फ्लॅटसमोर चालत होती. त्यावेळी आरोपी सोसायटीमध्ये आला होता पाचव्या मजल्यावर आला असता, त्यांनी वृद्धीले पाहिले. कोणी नसल्याचे पाहून त्यांने त्या वृद्ध महिलेवर झडप घालून तिचे तोंड दाबले, त्यानंतर जिन्यातून फरपटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन गळा दाबला तसेच हाताने मारहाण करून बलात्कार केला. हा प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता. या विरोधात महिलेने प्रतिकार केला तसेच आरडाओरड केली होती. मात्र तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.