कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकी घेतली. त्यावेळी त्यांना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुणे येथे कागल मधील मतदारांचा मेळावा घेतला.
या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती. याबाबत विचारले असता मुश्रीफानी नाव न घेता घाटगेंवर टीका केली. हसन मुश्रीफ म्हणाले, “पुणे येथे झालेल्या कागल तालुक्यातील मतदारांच्या मेळाव्यात खासदार सुळे यांनी माझ्यावर टीका केलेली नाही, त्यांनी ईडीचा विषय काढला पण कोणत्या प्रवृत्तीमुळे ईडीचे प्रकरण पुढे आले हे सर्वांना माहिती आहे”.