हुपरीजवळ चांदी उद्योजकाचा निर्घृण खून !

कोल्हापूर : हुपरीजवळ चांदी  उद्योजकाचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली. ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय 29) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरानीं घराच्या कपाटातील 25 किलो चांदी व दागिने लंपास केले आहे.

हुपरी येथील सिल्वर झोन मध्ये ब्रम्हनाथ हालुंडे हे आई-वडिलांसह राहत होते. ब्रम्हनाथ आणि त्यांच्या वडिलांचा चांदीचा व्यवसाय आहे. शनिवारी 21 सप्टेंबर रोजी आई वडील शेताकडे गेले असता ब्रम्हनाथ हे घरी एकटे होते . रविवारी सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडाच होता. आत प्रवेश करताच ब्रम्हनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्यांना धक्का बसला.

हल्लेखोराना ब्रम्हनाथ हे एकटेच घरी आहेत. याची माहिती असावी. हल्लेखोरांनी ब्रम्हनाथ यांच्या पोटात शस्त्राने वार केले होते. त्यांच्या बरकडीत वार झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. कपाटातील 25 किलो चांदी व दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती असून नेमकी ही घटना कोणत्या कारणातून झाली याचा तपास पोलीस करत आहेत.
रविवारी सकाळी नऊ वाजता ब्रह्मणात येळकोट येथील धार्मिक कार्यक्रमात महाप्रसाद घेऊन बाराच्या दरम्यान घरी आला होता. त्यामुळे हा खून दुपारनंतर घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.