कुंभोज (विनोद शिंगे)
यळगुड (ता.हातकणंगले )येथे 108 मुनीश्री आर्षकीर्ती जी महाराज यांच्या वर्ष-वर्धन महोत्सव सोहळ्यास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी, ग्रा प सदस्य राजेंद्र मांगुरकर, माजी सरपंच संदीप कारंडे,उद्योगपती धनंजय टारे, अमित कागले,राजू पुजारी,उमेश कागले,रणजित कांबळे,शुभम घूनके यांसह यळगुळ परिसरातील व संपूर्ण जिल्ह्यातील जैन श्रावक -श्राविका, इतर मान्यवर उपस्थित होते.