तिरुपतीतील प्रसादाच्या लाडूमध्ये आढळले चरबीचे अंश !

मुंबई : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात कोट्यवधी भाविक दर्शनासाठी जात असतात. या भाविकांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येतो. या लाडूमध्ये चरबीचा अंश आणि माशाच्या तेलाचा वापर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील अहवालावरून ही बाब समोर आली आहे. यामुळे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी आणि वाय एस आर काँग्रेस पार्टीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

 

टीडीपी ने सेंटर ऑफ अनालिसिस अँड लर्निंग इन लाईव्हस्टॉक एड फूड प्रयोगशाळेचा अहवाल जाहीर करत, वायएसआर वर टीका केली आहे. वायएसआर पार्टीच्या सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात प्रसाद आणि लाडू मध्ये वापरण्यात आलेल्या तुपामध्ये पशूंची चरबी आणि माशाचे तेल मिळाले असल्यास आरोप केला आहे. वायएसआर काँग्रेसने चंद्रबाबू नायडू स्वतःच्या स्वार्थासाठी असे आरोप करत असल्याचे टीका केली.

सीएएलएफ प्रयोगशाळेत अहवालात तुपात माशाचे तेल आणि बीफ टॅलोचे घटक मिळाले आहे.  त्यात काही प्रमाणात लॉर्ड सुद्धा आहे. लॉर्ड डुकराच्या पासून काढण्यात येतं. नायडू यांनी दावा केला की गेल्या पाच वर्षात वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुपती चे पावित्र्य कलंकित केल आहे. त्यांनी अन्नदान म्हणजे मोफत जेवणाच्या गुणवत्तेची तडजोड केली. तिरूमलाच्या पवित्र लाडू तील तुपामध्ये प्राण्याची चरबी वापरली.