मुंबई : कांदिवलीतील गणपती बंदोबस्त दरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग प्रकरणी चार आरोपींना कांदवली पोलिसांनी अटक केली. हरीश मांडवीकर, दीपक पांडे,सुभाष चौधरी आणि राजहंस कोकेसरेकर अशी या चौघांची नावे आहेत.
मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी हरीश मांडवेकर हा कांदिवली ते डहाणूकरवाडी परिसरात प्रतिबंधित परिसरातून विसर्जन स्थळी जात असताना, त्याला महिला शिपायाने थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्याशी हुज्जत घालून, दिला धक्काबुक्की केली. हरीशचे इतर सहकारी तेथे आलेत. चौघांनी पुन्हा हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी हरीश सह त्याच्या इतर सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. हरीश हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात हत्येचा, खंडणीसाठी धमकी देणे, हत्येचा प्रयत्न ,गंभीर दुखापत करणे असे दहा हुन अधिक गुन्ह्याची नोंद आहे.