धनंजय महाडिक कार्यकर्त्यांना योग्य ते आदेश देतील : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. तसेच ते महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप केला होता.
यासंदर्भात बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्ते हे आपल्याच नेत्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करत असतात. मेळाव्यात व्यक्त केलेल्या भावना आपणास समजल्या, परंतु नेत्यांना कार्यकर्त्यांना समजून सांगायचे असते, ते काम खासदार महाडिक करतीलच.

कागल विधानसभा मतदारसंघात तुतारी नाही तर घड्याळाची टिकटिक सुरू राहील. असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्ते बोलले असले तरी नेते कार्यकर्त्यांना योग्य ते आदेश देतील, असेही ते यावेळी म्हणाले.

🤙 9921334545