अजित पवारांनी आमदारांची बोलावली बैठक; देणार ‘या’ सूचना

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये महायुतीमध्ये काम करताना सर्वांशी जुळवून घ्या. अशा सूचना अजित पवार देणार असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसापूर्वी अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या, असा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अजित पवारही आपल्या सर्व आमदारांना एकत्रित करून महायुतीमध्ये काम करण्याबाबत तसेच पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घेण्याबाबत सूचना देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे आजची बैठक विधानसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत नाराजी या अनुषंगाने महत्त्वाची आहे.