कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच जनतेच्या सेवेत-अजित देवमोरे

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे
कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्र याबद्दल ग्रामपंचायत सदस्य मा.उपसरपंच अजित देवमोरे यांनी लेखनाच्या माध्यमातून कुंभोज आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या बाबतीत खुलासा केला आहे.
कुंभोजचे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आजारी आहे व धूळ खात पडली आहे. तर याबद्दल मी माहिती देतो की, गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायत कुंभोज चे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजन मिळून,हे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसोयी – सुविधायुक्त अशा पद्धतीने, लवकरात लवकर ते सुरु व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत. तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीची कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली होतीत असे,आमच्या निदर्शनास आले होते.त्यामुळे प्रथमता आम्ही सर्वांनी पाठपुरावा करून ती कामे पूर्ण करून घेतली आहेत.अजून थोडी बहुत कामे करणे बाकी आहेत,तीही आम्ही पूर्ण करून घेऊ.तसेच मागील आठवड्यातील बैठकीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ही उर्वरीत बाबी आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ.अशी सकारात्मकता दाखवली आहे.
खरी वस्तुस्थिती अशी आहे की, आपल्या या केंद्रासाठी प्रशासनाकडे पुरेसा स्टाफ नाही, तिथे लागणारी उपयुक्त साधन सामग्री उपलब्ध नाही. तसेच आता सध्य स्थितीला आपले कुंभोजचे जे आरोग्य पथक आहे. याचीच बिकट परिस्थिती आहे. येथे ही पुरेसा स्टाफ नाही.फार्मासिस्ट च्या जाग्यावर शिपाई बसवून काम चालवलं जातय.

औषध पुरवठा व्यवस्थित होत नाही. उपकेंद्राकडेही दुर्लक्ष होत आहे.अशी वस्तुस्थिती या आपल्या प्राथमिक आरोग्य पथकाची आहे. तर मग आपण सर्वांनी मिळून विचार करा की, प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन करून तेथेही पथकाची जी अवस्था आहे.त्याच पद्धतीने कारभार चालवा अशी ईच्छा आपल्या सर्वांची आहे का?
या उद्घाटनाच्या संदर्भात कोणतेही गटातटाचे वा राजकिय मतभेद वगैरे नाहीत हे मी स्पष्टपणे सांगतो.. प्रशासनाने आरोग्य केंद्रात ज्या काही गरजेच्या साधन सामग्री, गरजेचा असणारा स्टाफ व इतर सुविधा पूर्ण करून घ्याव्यात. व कधीही उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यावा. आमाचा कोणाचाही विरोध नाही.
तसेच कोरोना काळात आपल्या गावाच्या नावावर आलेली नवी कोरी Ambulance ही गायब आहे. त्याची ही मागणी आम्ही वारंवार करत आहे.
वरील सर्व गोष्टींचा पाठपुरावा आम्ही सर्वजन मिळून करत आहोत. त्यामुळे लवकरातच सर्व सोयीने सज्ज असे आपल्या गावाचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन होईल.असा विश्वास माजी उपसरपंच अजित देवमोरे यांनी बोलताना व्यक्त केला .

🤙 9921334545