इचलकरंजी काळ्या ओढ्याची आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून पाहणी

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

इचलकरंजी शहरातील काळ्या ओढा प्रदूषणाने व प्लॅस्टिकने खचाखच भरलेला आहे. त्याची पाहणी करताना महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे व मधुकर मुसळे सदस्य विमानतळ सल्लागार समिती, व महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्तानी  महापालिकेच्या संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांना काळ्या ओढ्यातील संपूर्ण प्लास्टिक जेसीबी लावून ताबडतोब काढण्याच्या सूचना दिल्या व काळा ओढा प्रदूषणमुक्त ठेवावा असे सांगितले. यावेळी मधुकर मुसळे  यांनी शहरांमध्ये प्लास्टिक वर संपूर्ण बंदी करावी अशी विनंती केली.

🤙 9921334545