मुंबई : राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असून, त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.
राज्यात 32 लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. परंतु रखडलेल्या नियुक्त्या, अनेक परीक्षेच्या प्रलंबित असलेल्या जाहिराती, परीक्षांच्या तारीखा जाहीर करण्यास होत असलेला विलंब. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली असल्याचे शरद पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हंटलं आहे.