कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
इचलकरंजी फेस्टिवल २०२४ आयोजित खास महिलांसाठी भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा आमदार प्रकाशआण्णा आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्षा किशोरीताई आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व फेस्टिवल संयोजिका मोश्मी आवाडे यांच्या उपस्थितीत ना. बा. घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या.
भारतीय संस्कृती जपण्यासाठी व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इचलकरंजी व परिसरातील अनेक महिलांनी सहभाग नोंदविला. पारंपरिक खेळ करून महिलांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये श्रद्धा ग्रुप महिला मंडळ (ज्वल) या ग्रुपने प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळविले, तर द्वितीय जय जिजाऊ महिला मंडळ ( इचलकरंजी) व तृतिय मैत्री ग्रुप महिला मंडळ (इचलकरंजी) यांनी मिळविले. चतुर्थ क्रमांक ताराराणी ग्रुप महिला मंडळ ( कोल्हापूर ) व उत्तेजनार्थ मानिनी ग्रुप महिला मंडळ कोरोची याप्रसंगी सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व विजेत्या सर्व महिला ग्रुपला फेस्टिवल संयोजिका सौ. मोश्मी आवाडे (वहिनी) यांची हस्ते पारितोषिक देण्यात आले. तसेच लकी ड्रॉ च्या माध्यमातून दोन महीलांना चांदीचे नाणे देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनु बोरवणकर, साधना माळी, प्रफुलता बिडकर यांनी काम पाहिले.
यावेळी द्राक्षायणीताई पाटील, मधु शिंदे, सानिका आवाडे, अहमद मुजावर, चंद्रशेखर शहा, उर्मिला गायकवाड, लक्ष्मी सपाटे, नजमा शेख, सोनाली तारदाळे, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शितल सूर्यवंशी, सपना भिसे, सीमा कमते, अंजुम मुल्ला, मंगला सुर्वे, सुनिता आडके, स्वाती काडाप्पा, अक्षय हजारे, संग्राम सटाले, मुझम्मिल सय्यद, सत्येन राजमाने, अक्षय आळंदे यांच्यासह स्पर्धक व प्रेक्षक उपस्थित होते.