कागल तालुक्यातील बाचणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी :सौरभ पाटील

कागल तालुक्यातील बाचणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा समरजीतसिंहा घाटगे यांच्या उपस्थितित संपन्न झाला. आजवर या आरोग्य केंद्राच्या पूर्णत्वासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला असून आज काही जण पोलीस बंदोबस्तात भूमिपूजन कार्यक्रम करत आहेत. असा टोला या कार्यक्रमावेळी समरजित घाटगे यांनी लगावला.

 

 

सन २०१३ साली मंजुरी मिळूनही तब्बल ११ वर्षे या कामाचा श्रीगणेशा होत नसल्यानेच नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. आज या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून भविष्यात कोणालाही आरोग्यविषयक सुविधांपासून वंचित राहावे लागणार नाही, असा विश्र्वास समरजितघाटगे यांनी व्यक्त केला.