रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक ;

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक केलेल्यांची नावे असून, ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

इंस्टाग्राम आणि फेसबुक वर अश्लील पोस्ट करणाऱ्या 32 जणांची लिस्ट रूपाली चाकणकर यांच्या वतीने सायबर क्राईम ला देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांवर कलम 72 /2024 कलम 354 ड 509, 34 या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सनी पारखे याला गंगापूर येथून तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक केली आहे.