पणजी येथे 59 वी डाक अदालत;

कोल्हापूर : पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन पणजी व्दारे 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोस्ट मास्तर जनरल, गोवा रिजन पणजी यांच्या कार्यालयामध्ये 59 व्या अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी दिली आहे.

 

 

 

गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा.

संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाक सेवा-1 पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह  19 सप्टेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.