मराठा आरक्षणानासाठी आंदोलक बनले आक्रमक ;

बीड :  मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. अशातच, बीडमध्ये गुरुवारी तीन अज्ञातांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न केला. चालक आणि मेकॅनिकने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत एसटी बसचं नुकसान झालं असून, बसमधील चार सीट्स जळून खाक झाल्या आहेत.

 

 

बीडच्या घोडका राजुरीजवळ एका एसटी बससमोर अचानक तीन अज्ञात लोकांनी कार आडवी लावली. त्यानंतर एसटी बसमधून चालक आणि मेकॅनिकला खाली उतरवलं, त्यानंतर त्या तिघांनी एसटी बसमध्ये पेट्रोल ओतलं आणि बसमधील सीट पेटवले. संबंधितांनी या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, चालक आणि मेकॅनिकनं प्रसंगावधान राखून आग विझवली. तोपर्यंत बसमधील 4 सीट जळून खाक झाल्या होत्या.