कोल्हापुरात बॅरिकेट तोडत पंचगंगा घाट गणपती मूर्ती विसर्जनासाठी खुला केला

कोल्हापूर : जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला अतिशय भक्तीमय वातावरण निरोप देण्यात आला . गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीने 206 हून अधिक ठिकाणी कृत्रिम कुंड बसविण्यात आली आहे. मात्र हिंदू पर्यंत प्रमाणे आम्ही गणपती पंचगंगेच्या वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार अशी भूमिका हिंदुत्वाची संघटनेने घेतली.

 

गेल्या तीन ते चार वर्षापासून गणपती विसर्जनासाठी पंचगंगा घाटावर बंदी घालण्यात आली होती, परंतु यावेळी बॅरिकेट तोडत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा घाट विसर्जनासाठी खुला केला. यामुळे हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी यावर्षी देखील पंचगंगा घाट परिसर बॅरिकेट लावून बंद केला होता. मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा घाट गणपती विसर्जनासाठी खुला करावा अशी मागणी पोलिसांनी प्रशासनाकडे केली मात्र प्रशासनाने हा घाट खुला न केल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. आणि त्यांनी बॅरिकेट तोडत पंचगंगा घाट गणपती मूर्ती विसर्जनासाठी खुला केला.