कोल्हापूर: बहिरेवाडी (ता. पन्हाळा ) येथील प्राध्यापक प्रियांका रणजीत पाटील (वय 31)हिला माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत होणाऱ्या छळास कंटाळून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
प्रियांकाचा विवाह कुंडल येथील रणजीत पाटील यांच्याशी 2017 मध्ये झाला होता. प्रियांकाला माहेरहून खाजगी साखर कारखाना खरेदीसाठी दहा लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केल्यानंतर तिने पाच लाख रुपये आणले होते. परंतु अजून पाच लाख रुपये आणण्यासाठी तिला शिवीगाळ ,मारहाण ,छळ करनं हे सुरू होत. याला कंटाळून तिने आपले जीवन यात्रा संपवली.
याप्रकरणी पती रणजीत सुभाष पाटील, सासू शोभा सुभाष पाटील, सासरे सुभाष पाटील ,दीर इंद्रजीत सुभाष पाटील ,जाऊ प्रज्ञा इंद्रजीत पाटील, आणि ननंद शितल चव्हाण या सहा जणावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रियांकाचे वडील सुनील वसंतराव पवार (रा.कुंडल ता.पलूस, जि.सांगली) यांनी फिर्याद दिली.