जनसुराज्य भाजपा व महायुतीच्या वतीने दहीहंडी

कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे

मिरज (जि.सांगली) येथील सिव्हिल हॉस्पिटल समोरील मैदानात पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भव्य जनसुराज्य भाजपा व महायुतीच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आमदार डॉ.विनय कोरे यांनी उपस्थित राहून सर्व गोविंद पथकांना शुभेच्छा दिल्या.

 

 

 

तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा सुपुत्र स्वप्निल कुसाळे याने पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मिरज विधानसभा मतदारसंघाचे नेते मोहन वनखंडे ,जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम,हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नेते अशोकराव माने (बापू) यांच्यासह मिरज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545