शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

 

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
करंजफेन (ता.पन्हाळा) येथील शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

शाहूवाडी- पन्हाळा विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ.विनय कोरे यांच्या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे म्हणूनच अनेक गावातील कार्यकर्ते गट-तट सोडून जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे  यांनी सांगितले..

करंजफेन गावचे माजी सरपंच ज्योतिराम कोंडीबा पाटील,वसंत लखू पछिंद्रे,महिपती गणपती नायकवडे,शामराव केरबा पाटील,शिवाजी अण्णापा पाटील,वसंत चंद्रकांत पाटील,सदाशिव बापू आरंडे,धनाजी महादेव पाटील,अविनाश दिनकर नायकवडे,महादेव बाळू पाटील,संदिप दामोदर पाटील,संभाजी बाळू पाटील,महेश वसंत पछिंद्रे,भगवान शामराव पाटील,अक्षय नायकवडे,ओमकार पाटील,विलास पाटील,महेश पाटील,सुनिल बाळू पाटील,पांडुरंग लव पाटील,अनिल बाळू पाटील,काशिनाथ बाळू पछिंद्रे,प्रदिप पाटील,संतोष पाटील,प्रदिप महिपती पाटील यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सागर जाधव – कोलोली यांच्या सहकार्यातून झाला…

🤙 9921334545