नृत्यांगना गौतमी पाटील महाआरतीसाठी कोल्हापुरात

कोल्हापूर: कोल्हापूर मधील राशिवडे गावात सावकार गणपतीच्या महाआरती साठी नृत्यांगना गौतमी पाटील आली होती.गौतमी पाटील आल्याचे कळताच तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.

 

 

 

 

कोल्हापूरमध्ये एक वर्षानंतर पहिल्यांदाच गौतमी पाटील महाआरतीसाठी उपस्थित राहिली . तरुणाईची गर्दी पाहून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला. रविवारी दुपारी एक वाजता महाआरतीसाठी गौतम पाटील चे आगमन झालं. गौतमी पाटील आरती नंतर जमलेल्या महिलांशी संवाद साधला काही महिलांनी तिला फुगडी खेळण्याचा आग्रह केला असता तिने फुगडीही खेळली.