मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे . विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही मोठी योजना केली आहे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेणार असून त्यासाठी काँग्रेसने नियोजन चालू केले आहे.
तुम्ही बोलवाल तिथे मी सभेला येईल असे राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या सांगली दौऱ्यानिमित्त सांगितल आहे.राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण देशात भारत दौरा केला होता. अनेक ठिकाणी त्यांनी सहभाग घेत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली त्याचाच परिणाम म्हणून भाजपचा लोकसभा निवडणुकीतील जागा कमी झाल्या.
आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहेत, या निवडणुकीत राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार असल्यामुळे काँग्रेसला या सभांचा फायदा होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.