रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

कोल्हापूर प्रतिनिधी:युवराज राऊत

विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण देतानाच, त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. त्यातून देश बलशाली बनवण्याचं काम, शिक्षक करत आहेत. अशा गुरूवर्यांचा सन्मान करणं गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ अरूंधती महाडिक यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळयात त्या बोलत होत्या.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या क्लबच्या वतीने गुरूवारी हॉटेल वृषाली येथे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. प्रारंभी विजयालक्ष्मी संबरगी यांनी क्लबच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, सचिव बी.एस.शिंपुकडे यांना कॉलर प्रदान केला. रोटरी क्लबचे कार्य तसेच शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती सचिव बी.एस. शिंपुकडे यांनी दिली. विद्यार्थ्यांना घडवून, देशाला बलशाली करणार्‍या गुरूजनांचा गौरव करणे हे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी रोटरीने यंदा कोल्हापूर टॅलेंट हंट सर्च परीक्षा घेण्याचं नियोजन केले आहे. त्यासाठी ८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी शिक्षक दिनाचे महत्व स्पष्ट केले. देशाची नवी पिढी सक्षमपणे घडवण्याचे काम गुरूजनांकडून होत असते. शिक्षक हेच आयुष्यातील श्रेष्ठ गुरू असल्याचे भाग्यश्री देशपांडे यांनी सांगितले.

 

दरम्यान रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे गुरूवर्य बी. एस. शिंपुकडे, रोटेरियन रमेश खटावकर, डॉ. भाग्यश्री देशपांडे यांचा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरस्कार विजेते रमेश भिसे, सुजाता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिकुल परिस्थितीतून आम्ही घडलो, त्यामुळे इतरांना मदतीचा हात देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल, असे त्यांनी नमुद केले. यावेळी अनिता जनवाडकर, गौरी पाटील, अनन्य येडगे, लक्ष्मी कांबळे, दिव्या बोडेकर, धनश्री हिरवे, सिध्दी पाटील, राहुल पाटील, करूणाकर नायर, दिपक मिरजे, भारती नायर, राजशेखर संबरगी, सचिन लाड, अवधुत अपराध उपस्थित होते.