महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी ;

सांगली : तासगाव तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. महिलेला जबरदस्तीने चारचाकी गाडीतून नेऊन मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) व बेळगाव येथे तिच्यावर अत्याचार केला.तसेच जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी विशाल दगडू मंडले (रा. नागेवाडी)याच्यासह चारचाकीचा चालक या दोधाविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी विशाल मंडले याने तासगाव तालुक्यातील एका महिलेला जबरदस्तीने तिच्या घरासमोरून गाडीतून नेले, तिच्यावर मळणगाव (ता. कवठेमहांकाळ] तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे बलात्कार केला. शिवाय तिचा पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच “तू इथून निघून गेली तर तुझे तुकतुकडे करीन, अशीही धमकी दिली.याप्रकरणी संबंधित पीडित विवाहितेने विशाल मंडले याच्यासह अन्य एका विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार दोधावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत.