फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन आनंदात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन रोटरी हॉल येथे आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राहुल चिकोडेतसेच जेष्ठ फोटोग्राफर्स यांच्या आयुष्यातील अनुभव सर्वांना ऐकायला मिळाले. याप्रसंगी विशेष प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या मुला मुलींचा सत्कार संपन्न झाला. त्याचबरोबर बारदोव्ही या हिंदी चित्रपटाच्या तंत्रज्ञांचा सत्कार देखील संपन्न झाला.

 

 

याप्रसंगी सुभाष फोटो चे शंभु ओऊळकर, किशन फोटो चे रितेश अगेचा, अलबम स्टेशन चे संतोष सुर्वे, जेष्ठ फोटोग्राफर संजय देवरुखकर, रघु जाधव, महेश बागे, प्रसाद बेंद्रे, मिलिंद गडकरी, हिंदी चित्रपट बारदोव्ही चे तंत्रज्ञ ऐश्वर्य मालगावे, शेखर गुरव, विक्रम पाटील, आय टी तज्ञ जयदीप मोरे आदी मान्यवर तसेच असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जकाते, प्रभात चौगुले, जगदीश गुरव ,विनायक कुचगावे, युवराज राऊत,अमर जाधव, अभिषेक शिवदास, सुरेश मोरे, सायलेस मंपडलेकर आदींसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.