सुपारी देऊन केला यळगूड येथील वाहनांची पंक्चर काढणाऱ्या मेस्त्रीचा खून

कोल्हापूर : काही दिवसापूर्वी सुट्या पैशाच्या कारणातून वाहनांची पंक्चर काढणाऱ्या मेस्त्रीचा खून झाल्याची घटना यळगूड येथे घडली होती. परंतु पंक्चर दुकान बळकवण्याच्या हेतूने दोन लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खुनाची सुपारी देणाऱ्या व घेणाऱ्या दोन मुख्य सूत्रधारासह तिघांना हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

 

 

अजय दिलीप शिंगे (वय 23 रा. अंबिकानगर), तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे (24,रा.शाहूनगर दोघेही हुपरी) व आर्यन दत्तात्रय घुणके (22, रा.मानेनगर,रेंदाळ) अशी अटक केलेल्या संशयीताची नावे आहेत. या खून प्रकरणात आणखीन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे. आतापर्यंत दोघा अल्पवयीन मुलासह सहा जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यापैकी चौघे जण अटकेत आहेत.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यळगूड येथे मेस्त्री गिरीश विश्वनाथ पिल्लाई यांचा(शनिवारी 31 ऑगस्ट) रात्री खून झाला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. पंक्चर कामाचे पैसे देताना सुट्ट्या पैशावरून वाद झाला, आणि त्यातून खून केल्याची कबुली अटकेतील संशयित नचिकेत विनोद कांबळे यांनी दिली होती. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला होता पोलिसांनी नचिकेत कडे कसून चौकशी केली त्यावेळी गुन्ह्यात अनिकेत कांबळे सह आणखी काही जणांचा सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली नुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतली त्यावेळी संगणमताने कट रचून दुकान बळकवण्यासाठी गिरीश यांचा खून केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांनी दिली.