विधानसभेची निवडणूक म्हणजे ‘नायक विरुद्ध खलनायक’ : हसन मुश्रीफ

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी येणारे विधानसभेची निवडणूक म्हणजे नायक विरुद्ध खलनायक असल्याची टीका केली.मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, शरद पवार यांच्याशी माझे वैर नाही परंतु समरजीतसिंह घाटगे यांची आता खैर असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

 

पत्रकारांनी, तुमच्या मागे कारवायांचा ससेमेरा लावला होता. व तुमच्या कुटुंबाची फरपट झाली होती. असा प्रश्न विचारल्यावर मुश्रीफ यांनी पत्रकारांनाच प्रतिशब्द केला की, तो ससेमेरा कोणी लावला यावेळी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांपैकी एकाने उत्तर दिलं. समरजीत सिंह घाटगे.हा संदर्भ घेत हसन मुश्रीफ म्हणाले की, त्यामुळेच ही निवडणूक म्हणजे नायक विरुद्ध खलनायक अशी लढत आहे.