मानसिंग पाटील युवा मंच व  अर्पण ब्लड बँक यांच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित ;

कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत

सामाजिक कार्यकर्ते मानसिंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तरी या शिबिरास  फुलेवाडीतील तरुण मुलांनी व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबिरास १२७ बोटल रक्तदान करून मोलाचे योगदान दिले . तरी या कार्यक्रमास फुलेवाडी भागातील सर्व तरुण मुले, मुली व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केल्याबद्दल मानसिंग पाटील  यांनी सगळ्यांचे आभार मानून अशीच साथ  द्यावी अशी विनंती केली .

 

तसेच, या कार्यक्रमास मार्गदर्शक  कृष्णात श्रीपती पाटील, विवेक महाडिक  , मानसिंग पाटील, अमर पाटील, श्रीकांत पोवार, माधवी पाटील, राहुल कसबेकर, अमित पाटील ओमकार पाटील, युवराज पाटील, शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

🤙 8080365706