देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवण्याचं काम भाजप नेते करतात : राहुल गांधी

सांगली: काँग्रेस नेते राहुल गांधी हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत काँग्रेसचे नांदेड चे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. यानंतर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सांगलीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली.

 

ते म्हणाले, भारत देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवण्याचं काम भाजपवाले करत आहेत. हीच लढाई इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, आंबेडकर यांनी लढली होती. ही तीच लढाई आज काँग्रेस लढत आहे. याच महापुरुषांची विचारधारा पाहिली तर त्यांची प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसते. भाजप नेत्यांना संविधान संपवायचे आहे. असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.