कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
कुंभोज गावचे सुपुत्र व सातारा जिल्हा मागासवर्गीय काँग्रेसचे प्रभारी विजयकुमार भोसले यांनी आपला वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा कुंभोज येथील सर्वच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा देऊन विद्यार्थी हे शिक्षणाने समृद्ध होण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या गरजांची पूर्तता करणे हे आपले कर्तव्य मानून त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

यावेळी प्रभारी विजयकुमार भोसले यांचा सत्कार ग्रामपंचायत कुंभोजचे उपसरपंच अशोक आरगे महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, शिवसेना शहराध्यक्ष दीपक कोळी, वडगाव बाजार समितीचे माजी संचालक सचिन कोळी तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोणे, संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले, मुख्याध्यापक श्रीकांत गुंदावडे ग्रामपंचायत सदस्यविनायक पोद्दार आप्पासाहेब पाटील, सदाशिव महापुरे दावीद घाटगे तसेच ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांची पदाधिकारी व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यपाल नियुक्त कोट्यातून आपली आमदार पदासाठी शिफारस काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून राज्यपाल नियुक्त कोठ्यातून आपण आमदार झाल्यास नक्कीच कुंभोज येथील केंद्र शाळेचा व गावचा चेहरा मोहरा बदलेल त्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. असे गौरव उद्गार काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे प्रभारी विजयकुमार भोसले यांनी सत्कार प्रसंगी काढले.
