मुंबईत सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी सरस ;

मुंबई: विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती आपले सरकार टिकवण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला सरकारमध्ये कमबॅक करायचा आहे.

 

 

ज्येष्ठ सिफोलॉजिस्ट दयानंद नेने यांनी 16 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या काळात एक सर्वेक्षण केले आहे. यानुसार लाडकी बहीण योजना महायुतीच्या बाजूने चांगली कामगिरी करत नसल्याचे दिसते .या सर्व्हेक्षणामध्ये महायुतीच्या कामगिरी बदल विचारले असता 28% जनतेने ती चांगली असल्याचे म्हटले आहे 20 टक्के जनतेने समाधानकारक आहे तर 20 टक्के जनतेने खराब असल्याचे म्हटल आहे. 21%  जनतेने कामगिरी असमाधान धारक तर ११ टक्के लोकांनी माहीत नाही असे उत्तर दिले आहे.
मुंबईमध्ये महाविकास आघाडीला 36 पैकी 21 विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे .तर महायुतीला अवघ्या 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबई ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच राहण्याची संकेत मिळतात.