धुळ्यात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला;

धुळे : आझाद नगरच्या कृषी महाविद्यालय परिसरातील शेतकरी पुतळ्याजवळ  सायंकाळी ५ च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हा मृतदेह शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारोळा रोड नजीकच्या नालीत संशयास्पद मृतदेह आढळून आला. मृताचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून सदर पुरुषाच्या उजव्या हातावर सूर्याची प्रतिमा आणि जय भीम असे मराठी शब्दांत गोंदलेली खूण होती.या घटनेने संपूर्ण आझाद नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

पारोळा रोड हा धुळे शहरातून जळगावकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. याच परिसरात वावरत असलेल्या नागरिकांना नालीमधून ठिकाणाहून दुर्गंधी येत होती. याबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतहेद ताब्यात घेतला आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी हिरे वैद्यकीय रुग्णालयात पाठवला आहे.

🤙 9921334545