मुंबई : उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये 38 वर्षाच्या एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या घरच्यांनी त्रास दिल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. गळफास घेत त्याने आपले आयुष्य संपवले.
जगजीत सिंह राणा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने दोन व्हिडिओ बनवले. यात जगात सर्व काही करा, पण लग्न करु नका, जय श्रीराम, असे म्हणताना तो या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ त्याने आपल्या नातेवाईकांना शेअर केला आहे.