पुणे: पुण्यातल्या स्वारगेट परिसरात भटक्या कुत्र्यांना निर्दयीपणे मारहाण केल्याबद्दल पिता-पुत्रावर गुन्हा नोंद झाला आहे. भरतकुमार धनराज गांधी आणि हर्षद भरतकुमार गांधी असे या दोघांची नावे आहेत ते स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिनाथ सोसायटीमध्ये राहतात.
कुत्र्यांना मारहाण झाल्याची बातमी प्राणी प्रेमी एडवोकेट अमित शहा याना समजली. याबद्दल त्यांनी भरतकुमार यांना विचारलं असता, कुत्र्याने गाडीची सीट फाडली आणि बऱ्याच जणांचं नुकसान केलं आहे, असं सांगितले. शहा यांनी नुकसान भरपाई करतो असं सांगून सुद्धा मारहाण केल्यामुळे संतप्त शहा यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. पोलिसांनी दोघा विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.