सांगली : लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात बाळासाहेब गलगले यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सेवा पुरस्काराचे वितरण हे सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाजपला जातीयवादी ठरवणारे नेते व पक्षाशी आघाडी करून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव धुळीस मिळवलं. बाळासाहेबांनी “गर्व से कहो हम हिंदू हे “अशी गर्जना करून चेतना निर्माण केली.उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस समवेत एकाच व्यासपीठावर असताना ती घोषणा द्यावी. मी राजकारण सोडेन असे आवाहन त्यांनी येथे केले.
काँग्रेस सह राष्ट्रवादीला न रुचणारे परिवर्तन भाजप ने केल आहे शरद पवार यांनी वर्षानुवर्ष झुलवत ठेवलेलं मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये दिलं आणि योग्य तो न्याय दिला. असेही यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले.
श्रीकांत शिंदे ,रजनी गोखले ,सुभाष खराडे, श्रीवल्लभ कुलकर्णी ,अतुल कुलकर्णी ,सार्थक गोसावी,शुभम पत्की, रवींद्र वादवणी,निरंजन कुलकर्णी, शैलेश पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.