हिंगणगाव बनत आहे एक विकासात्मक पॅटर्न तालुक्यात आदर्श-सरपंच दीपक पाटील

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे 

हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील ग्राम पंचायतीच्या वतीने 25 -15 मधून मोठ्या प्रमाणात गावात रस्त्यांचा विकास केला जात असून, यामुळे हिंगणगाव परिसरात तील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे .परिणामी गेल्या दीड वर्षात जवळजवळ तीन कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेतून हिंगणगाव परिसराचा विकास करण्यात आला असून गावातील सर्वच रस्ते पूर्ण झाले असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. परिणामी गावचा महत्वाचा प्रश्न असणारा रस्ते व गटरचा प्रश्न लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने हिंगणगाव ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

 

परिणामी येत्या पाच वर्षात दहा कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेची विकास कामे आपण हिंगणगाव परिसरात करणार असून त्यासाठी हिंगणगाव ग्रामस्थांचे सहकार्य सतत मिळत आहे ‌. भागातील अनेक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी निधी देण्याची आश्वासने दिली परंतु ती अजून अजून पूर्ण झाली नसून दिलेली आश्वासने हीआश्वासनेच ठरत आहेत. परिणामी हिंगणगावचा विकास करत असताना मोठ्या प्रमाणात मुंबई मंत्रिमंडळात गिरिश महाजन -ग्रामविकास मंत्री ,व संदिपान बुमरे-रोजगार हामी मंत्री यांनी

निधी उपलब्ध करून दिलाअसून हिंगणगाव ग्रामस्थांच्या वतीने निधी देणाऱ्या सर्वच मंत्रिमंडळातील आमदारांचे आभार मानण्यात आले.
परिणामी हिंगणगावच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याचे चित्र दिसत असून अशा पद्धतीने विकास कामे होत राहिल्यास हातकणंगले तालुक्यात हिंगणगाव एक विकासात्मक पॅटर्न ठरेल व त्याचे श्रेय स्वाभिमानी आघाडीचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना जाते. येणाऱ्या काळात हिंगणगाव मध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा पुरविण्यास मी लोकनियुक्त सरपंच या नात्याने बांधील असून त्या पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अशी भूमिका सध्या लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांनी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
परिणामी सध्या पंचवीस पंधरा मधून सुरू असणाऱ्या सर्वच रस्त्यांची कामे उत्कृष्ट व टिकाऊ पद्धतीची झाल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.