राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूज यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक

कोल्हापूर:वारणानगर (ता.पन्हाळा) येथे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आमदार डॉ.विनय कोरे व शुभलक्ष्मी विनय कोरे यांच्या उपस्थितीत पार पडली
५० हजारांवर महिला कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी सांगितले
श्वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांसाठी शिवनेरी क्रिडांगणावर भव्य चार मंडप उभारण्यात आले आहेत.यामध्ये महिलांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे ५० हजार महिला शिवनेरी क्रिडांगणावर उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ.विनय कोरे यांनी दिली.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी कोल्हापूर जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच येणार असल्याचेही डॉ.विनय कोरे यांनी सांगितले

तसेच सर्व महिलांनी दुपारी १.३० च्या आत शिवनेरी क्रिडांगणावरील उभारण्यात आलेल्या भव्य मंडपातील बैठक व्यवस्थेचा लाभ घ्यावा.
तसेच महिलांनी कोणतेही काळे वस्त्र परिधान करू नये किंवा काळ्या रंगाची वस्तू सोबत ठेवू नये. तसेच कोणतीही पिशवी,पर्स,पाण्याची बोटल,छत्री अशा कोणत्याही वस्तू सोबत आणू नयेत. विशेष सुरक्षा पथकाच्या मार्फत प्रवेश द्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. यांची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन डॉ.विनय कोरे यांनी केले.