महाविकास आघाडी कडून १ सप्टेंबर रोजी आंदोलन : उद्धव ठाकरे

मुंबई: मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे तेथे पोहोचले. यावेळी ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मुंबई येथील मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी १ सप्टेंबर रोजी हुतात्मा चौकात जाऊन आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

🤙 8080365706