कोल्हापुरातील कलाशिक्षक सागर बगाडे यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर ;

कोल्हापूर:  स. म. लोहिया हायस्कूल मधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे, ( रा.पाचगाव ता. करवीर ) यांना मंगळवारी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये त्यांना राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. सागर बगाडे हे स. म. लोहिया हायस्कूलमध्ये गेली 24 वर्ष कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते एक उत्तम चित्रकार, रंगकर्मी व नृत्य दिग्दर्शक आहेत.

 

सार्थक क्रिएशन या नृत्य संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक गाजवला आहे. यासह त्यांनी कोल्हापुरातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनाथ व निराधार बालके सेक्सवर्कर अशा वंचित घटकांसाठी काम केले आहे महापुरात नागरिकांच्या बचाव कार्यातील ते सहभागी होते. जिल्हा, राज्य व केंद्रस्तरावरील मुलाखती छाननी नंतर अंतिम फेरीसाठी राज्यातील सहा शिक्षकांची निवड झाली होती. त्यामधून कोल्हापुरातील सागर बगाडे व गडचिरोली येथील बेडगे यांना हा पुरस्कार जाहीर झाला.

🤙 9921334545