कोल्हापूर प्रतिनिधी; युवराज राऊत
अँटी करप्शन च्या पोलिस उपाधीक्षक पदी वैष्णवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवार 27 ऑगस्ट रोजी वैष्णवी पाटील यांनी पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या वैष्णवी पाटील यांची कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक पदी नियुक्तीच्या आदेश काढले.
नागरिकांनी निर्भयपणे आमच्याशी संपर्क साधून तक्रार द्यावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल तक्रारदारास आरोपीचा कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार असून, या तक्रारीची चर्चा न करता गोपनीयता ठेवावी त्यामुळे भ्रष्ट लोकाविरुद्ध सापळा कारवाई यशस्वी होईल. त्यामुळे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांक 1064 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन वैष्णवी पाटील यांनी केला आहे.