विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी नेत्यांची गर्दी; महायुतीतील काही नेत्यांचाही समावेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतली त्यानंतर काँग्रेस मधील नेत्यांसह महायुतीतील नेत्यांचाही काँग्रेस पक्षावर विश्वास वाढला कारण विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील चौदाशे जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.

 

याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हटले की, लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवाराकडून हजारो अर्ज प्राप्त होत आहेत. परंतु आम्ही हे स्पष्ट केले आहे की, उमेदवारी ही मेरिटनुसार दिली जाईल. काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच महायुतीतील काही नेतेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली, त्यानंतर काँग्रेसला काही निवडणुकांमध्ये उमेदवार मिळत नव्हते मात्र आत्ताची परिस्थिती बदलली आहे. लोकसभेत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाल्यानंतर विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी प्रयत्नशील आहे. विधानसभेत काँग्रेस कशी कामगिरी करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.