कोल्हापूरातील युवाशक्ती दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष पथकाने फोडली !

कोल्हापुर: कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक यांच्या युवाशक्ती दहीहंडीची पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच दहिहंडी अशी ओळख आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी ऐतिहासिक दसरा चौकामध्ये दहीहंडी चे आयोजन युवाशक्तीकडून करण्यात आलं होतं. ही दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष पथकाने फोडून तीन लाखांचे मानकरी ठरले. गणेश कांबळे या गोविंदाने ही दहीहंडी फोडली.

 

सायंकाळी पाच वाजल्यापासून दसरा चौकामध्ये दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली. सहभागी गोविंदा पथकांनी सातच्या सुमारास सलामी दिली. त्यानंतर थरांचा थरथराट सुरू झाला. शिवगर्जना, संघर्ष ग्रुप, नृसिंह, नेताजी पालकर, पथकांनी सहा ते सात थर लावून सलामी दिली. त्यानंतर दहीहंडी फोडण्यास प्रयत्न सुरू झाले. कुपवाडच्या नृसिंह गोविंदा पथक, नेताजी पालकर पथकाने सात थर लावले. मात्र दहीहंडी फोडण्यात त्यांना यश आलं नाही.त्यानंतर काही फुटा ने दहीहंडी खाली घेण्यात आली.

त्यानंतर सोडत काढण्यात आली यामध्ये संघर्ष ग्रुपला संधी मिळाली आणि या संधीचे सोने करून संघर्ष ग्रुपने साडेदहाच्या सुमारास दहीहंडी फोडली.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भागीरथी उद्योग समूहाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, मंगल महाडिक, पृथ्वीराज महाडिक, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक, माजी नगरसेवक सत्यजिय कदम, भाजप जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, शिवसेना शहराध्यक्ष सुजित चव्हाण, नाथाजी पाटील आदि उपस्थित होते. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केलं.