माढा : माढ्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये परतण्याच्या चर्चा आहेत. यामध्ये बबन शिंदे यांचे नाव आहे.
बबन शिंदे यांचा मुलगा रणजीत शिंदे यावेळी माढ्यातून उभे राहण्याच्या तयारीत आहेत. याचा विचार करून बबन शिंदे अजित पवारांची साथ सोडून पवाराकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.