चांदोली: चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणाची दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या धरणातून पाणी सोडल्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील उखळी येथील एका शेतकरी महिलेकडील सहा जनावरे नदीपात्रात अडकली होती, त्यांच्या मुलाने धरण प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सहा जनावरांचे प्राण वाचवले. अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत धरणाची दरवाजे बंद केले. त्यानंतर धरणाची चारही दरवाजे उघडण्यात आली.
अधिक माहिती अशी कि ,शाहूवाडी तालुक्यातील महिला शेतकरी सविता संजय वडाम व त्यांचा मुलगा अनिकेत हे दोघे चरण्यासाठी जनावरांना घेऊन रानात गेले होते. ही जनावरे नदी पात्रात उतरली होती. अचानक धरणातून पाणी सोडल्याने ही जनावरे पाण्यात अडकली अनिकेतने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या नाथा वडाम हे पाटबंधारे विभागात कोल्हापुर येथे कार्यरत आहेत. त्यांना संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ही बातमी कळवली काही मिनिटातच अधिकाऱ्यांनी दरवाजे बंद केल्यामुळे सहा जनावरांना बाहेर काढण्यात यश आलं.