अहमदनगर :लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला राजकीय धक्के दिले आहेत.यानंतर आता नगर जिल्ह्यात त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. भाजपचा बडा नेता तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चांना उद्याना आलं आहे.
कोपरगाव चे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच कोपरगाव चे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र येणार आहे. शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विवेक कोल्हे लवकरच तुतारी हातात घेणार का? अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत .
