नेव्हीला बदनाम करू नका: सतेज पाटील सरकारवर भडकले!

कोल्हापूर : मालवण मधील राजकोट येथे नौदल दिनानिमित्त उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट दुपारी एक वाजता कोसळला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पुतळा कोसळला असल्याचे सरकारने सांगितले आहे.

 

अशातच आता शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे सरकारवर संतापले आहेत. आपटे नावाच्या व्यक्तीला काम देण्याबाबत सरकारनेच नेव्हीला सांगितले. छत्रपती संभाजीराजे यांनी या पुतळ्या संदर्भात आक्षेप घेतला होता, पण सरकारला पुतळ्याचे अनावर करण्याची घाई झाली होती.त्यामुळे चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी मात्र नेव्हीवर ढकलू नये, नेव्हीला बदनाम करू नका. स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचं काम सरकार करत आहे. असा घणाघात सतेज पाटील यांनी केला आहे

🤙 8080365706