मुंबई:काही वर्षांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षांतर करणार असल्याच्या या चर्चा रंगू लागल्या आहेत.
याबाबत हर्षवर्धन पाटील यांना प्रसारमाध्यमानी विचारल असता ते म्हणाले की, माझ्या मतदार संघांमध्ये लोकांचा खूप आग्रह आहे की, मी उभे राहिले पाहिजे अप्रत्यक्षपणे मतदारांचा निवडणूक लढण्यासाठी दबाव असल्याचे विधान त्यांनी केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की,माझा मतदार आता खुला बोलायला लागला आहे, मला ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालावी लागणार आहे, त्यामुळे आम्हाला याबाबत अंतिम निर्णय सांगा,तुम्ही काय करणार आहात?
या त्यांच्या या वक्तव्याने ते खरंच पक्षांतर करणार का अशी चर्चा होत आहे.