पोलिसांवर कोयत्याने हल्ला करणारे फरारी आरोपी अखेर सापडले;

पुणे: सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर रविवारी 25 ऑगस्ट रोजी, कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. आरोपींनी डोक्यावर वार केल्याने अधिकारी गंभीर झाले,त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना  यश आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

 

पुण्यातील हडपसर भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे दुचाकी वरून जात होते त्या ठिकाणी दोन गटात वाद सुरू झाल्याचे त्यांना निदर्शनास आले त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु भांडण सोडवताना आरोपीने आपल्या हातातील कोयता अधिकार रत्नदीप गायकवाड यांना फेकून मारला. डोक्यात वार झाल्याने ते जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, निहाल सिंह मनुसिंह टाक(रा.तुळजाभवानी वसाहत,हडपसर),राहुलसिंग भोंड (हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत.
फरारी आरोपींना सोलापूर पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली